रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाचे देव-घैसास-कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयामध्ये समाजशास्त्र विभाग आणि IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सामाजिक संशोधन’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानाकरिता प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रशांत तानाजी नारगुडे (आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालय) उपस्थित होते. सामाजिक संशोधन आणि संशोधनाचे पद्धतीशास्त्र याविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती मिळावी हा हे सत्र आयोजन करण्यामागचा प्रमुख हेतू होता.
डॉ. प्रशांत नारगुडे यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक संशोधनाचे प्रकार, संशोधन पद्धती, तथ्य संकलनाचे तंत्र, संशोधन नीतिमत्ता, आणि संशोधनाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या सौ. मधुरा पाटील, महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव, कला विभागाच्या विभाग प्रमुख सौ. ऋतुजा भोवड, IQAC समन्वयक स. प्रा. राखी जाधव, समाजशास्त्र विभाग प्रमुख स. प्रा. हर्षदा लिंगायत यांसोबत इतर प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. निलाक्षी राऊत (प्रथम वर्ष कला) हिने केले. कु. पूर्वा सुर्वे हिने सर्वांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना व्याख्यानामार्फत सामाजिक संशोधन या समकालीन आणि महत्वपूर्ण विषयावरती सखोल ज्ञान मिळाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:21 PM 31/Jan/2026














