Sunetra Pawar : सुनेत्रा पवार विधानभवनात दाखल!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बुधवारी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. यानंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

आज सायंकाळी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार आहे.

त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत.

या शपथविधीपूर्वी विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची महत्त्वाची बैठक होणार आहे.

या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली जाणार आहे.

या बैठकीसाठी सुनेत्रा पवार विधानभवनात झाल्या आहेत.

यावेळी राष्ट्रवादीचे सर्व आमदार पायऱ्यांवर उभे राहिल्याचे पाहायला मिळाले.

राष्ट्रवादी गटनेते पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव जेष्ठ नेते म्हणून छगन भुजबळ मांडणार आहे.

छगन भुजबळ यांच्या प्रस्तावाला पाच ते सहा नेते अनुमोदन देणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:47 31-01-2026