कांगोमध्ये मोठी दुर्घटना, खाणकाम सुरू असताना खाणीमध्ये भूस्खलन

पूर्व कांगो लोकशाही प्रजासत्ताक देशाातील रुबाया कोल्टन खाणीमध्ये भीषण भूस्खलन होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत सुमारे २२७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे.

शेकडो लोक खाणीमध्ये काम करत असताना खाणीमधील माती खचून ही दुर्घटना झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.

या प्रांतामधील बंडखोर गटाकडून नियुक्त करण्यात आलेल्या गव्हर्नरचे प्रवक्ते लुबुम्बा काम्बेरे मुइसा यांनी सांगितले की, खाणीमध्ये भूस्खलन झालं तेव्हा खाणीमध्ये कामगारांसोबतच मुले आणि बाजारामध्ये काम करणाऱ्या महिलाही उपस्थित होत्या. दुर्घटनेनंतर काही लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. त्यामधील सुमारे २० जखमींवर उपचार सुरू आहेत.

तर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी संध्याकाळपर्यंत मृतांची संख्या किमान २२७ पर्यंत पोहोचली होती. मात्र हा आकडा वाढू शकतो. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. पण सतत पडत असलेला पाऊस आणि ठिसूळ जमिनीमुळे मदत कार्यामध्ये अडचणी येत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:25 31-01-2026