रत्नागिरी : येथील रेल्वे स्टेशननजीक अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. आदित्य अविनाश मुकादम यांच्या मुकादम हॉस्पिटलचा प्रारंभ माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश मुकादम यांच्या हस्ते झाला.
यावेळी डॉ. अविनाश मुकादम, डॉ. पौर्णिमा मुकादम, डॉ. प्रियांका मुकादम उपस्थित होते. डॉ. आदित्य मुकादम यांनी कोल्हापूर येथील मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून मुंबई येथील मणीपाल विद्यापीठातून एमएच आर्थोचे शिक्षण पूर्ण केले आहे. ते सुवर्णपदक विजेते असून त्यांनी मुंबईतील केईएम, लिलावती या मोठ्या रुग्णालयात प्रक्टिस केली आहे.
सध्या ते रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात कार्यरत आहेत. या रुग्णालयात जॉईन्ट रिप्लेसमेंट, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या हाडांच्या दोषावरील उपचार, सांधेदुखी, कंबरदुखी, खांदेदुखी आदी सर्व विकारांवर उपचार रत्नागिरीत केले जाणार आहेत. येथील प्रथितयश डॉक्टर अविनाश मुकादम, डॉ. पौर्णिमा मुकादम, त्यांच्या पत्नी डॉ. प्रियांका मुकादम या भूलतज्ज्ञ आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:15 PM 29/Oct/2024














