रत्नागिरी : श्री देव भैरी, श्री देवी जोगेश्वरी, श्री देवी नवलाई पावणाई व श्री देव तृणबिंदुकेश्वर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्रीदेव भैरी मंदिरातील गणपती, श्रीदेव तृणबिंदकेश्वर, श्रीदेव जंबुकेश्वर, श्रीदेवी त्रिमुखी व नंदी या पाच मूत्यर्त्यांचे वज्रलेपन करण्यात आले. या मूर्तीची विधिवत पुनःप्रतिष्ठापना ३ व ४ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. ३ फेब्रुवारी रोजी पुण्याहवाचन, जलाधीवास, देवता स्थापना, देव निद्रा तसेच प्रदक्षिणा आदी धार्मिक विधी होणार आहेत.
तर ४ फेब्रुवारी रोजी देवता पूजन, अग्नी स्थापना, ग्रह होम, वास्तु होम, प्राणप्रतिष्ठा, देवता उत्थापन, पूर्णाहुती, बलिदान व अभिषेक यांसारखे महत्त्वपूर्ण विधी होणार आहेत. या पवित्र धार्मिक सोहळ्याला सर्व ग्रामस्थ, मानकरी व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देव भैरी देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 02/Feb/2026














