चिपळुणात भरधाव दुचाकीच्या धडकेने सायकलस्वार जखमी

चिपळूण : शहरातील नगर परिषद परिसरात १ फेब्रुवारी दुपारी भरधाव दुचाकीस्वाराने सायकलवरून जाणाऱ्या नागरिकाला जोरदार धडक देऊन पलायन केल्याची घटना घडली. या धडकेत सायकलस्वार गंभीर जखमी झाला असून अधिक उपचारासाठी त्याला रुग्णालयात पोलिसांनी दाखल केल्याचे समजते. या धडकेत संबंधित सायकलस्वार जागेवरच पडल्याने गंभीर जखमी झाला तर धडक एवढी जोरात होती की त्या दुचाकीचे मडगार्ड तुटून लांब अंतरावर उडाले.

धडक झाल्याचा जोरदार आवाज होताच परिसरातील व्यापाऱ्यांनी धाव घेतली. तसेच धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याही स्थितीत तो दुचाकीस्वार भरधाव वेगाने पळून गेला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन जखमी सायकलस्वारास रुग्णालयात हलवले. धडक देऊन पलायन केलेला दुचाकीस्वार बाजारपेठेतील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्या आधारे पोलिसांनी तपास करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 02/Feb/2026