रत्नागिरी :
कर सल्लागार असोसिएशन, रत्नागिरी जिल्हा यांच्या वतीने दिनांक ०१ फेब्रुवारी २०२६ (रविवार) रोजी सकाळी १०.३० वाजता बजेट सेमिनार २०२६ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय अर्थसंकल्पीय सत्राचे थेट प्रक्षेपण सदस्यांसाठी पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
बजेट सत्रानंतर दुपारी १२.३० वाजता वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम हॉटेल व्यंकटेश एक्झिक्युटिव्ह, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला होता.
सायबर सुरक्षा, समाजहित व जनजागृती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मा. डॉ. अक्षय फाटक यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच संस्थेच्या सभासदांपैकी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सौ. निशा आंबेकर व श्री. राजेंद्र भावे यांचा देखील पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
सदर पुरस्कार वितरणाचा मान वरिष्ठ चार्टर्ड अकाऊंटंट श्री. एच. एल. पटवर्धन यांच्या हस्ते पार पडला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष श्री. रमाकांत पाथरे, उपाध्यक्ष सी. ए. अभिजीत पटवर्धन, खजिनदार सी. ए. ऋषिकेश फडके उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव ॲड. रविंद्र साळवी व कार्यकारिणी सदस्य श्री. धनेश रायकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सभासदांनी सहकार्य केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 02-02-2026














