Ratnagiri : शीळ येथील नदीच्या किनारी हातभट्टी दारू धंद्यावर पोलिसांची धाड

रत्नागिरी : मौजे शीळ येथील नदीच्या किनारी बेकायदेशिरपणे चालवण्यात येणाऱ्या गावठी हातभट्टी दारू धंद्यावर शुक्रवार, दि. ३० जानेवारी रोजी सकाळी ७.३५ वा. सुमारास शहर पोलिसांनी धाड टाकत टाकली. या धाडीत ३६ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

शैलेश अनंत सावंत (५२, रा. शिळ, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड कॉन्स्टेबल पंकज पडेलकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हा शिळ गावातील नदी किनारी असलेल्या झाडी-झुडपात बेकायदेशिरपणे गावठी दारू धंदा चालवत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे शहर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी त्याठिकाणी धाड टाकली. या धाडीत ६०० लि. गूळ नवसागरमिश्रित कुजके रसायन, ६५ लिटर गावठी हातभट्टीची दारु आणि इतर साहित्य असा एकूण ३६ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी संशयितावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:56 AM 02/Feb/2026