रत्नागिरी : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आता ज्येष्ठ नागरिकांनीही शालेय विद्यार्थी आणि आपल्या नातवंडांपर्यंत वाचन संस्कृती निर्माण करण्याचे प्रयत्न करावेत.
कुवारबाव संघात सुरू केलेल्या संतश्रेष्ठ श्री गाडगेबाबा वाचन कक्षामार्फत ग्रंथालय चळवळीचा प्रसार करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन माजी प्राचार्य दत्ता पवार यांनी केले.
कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. दत्ता पवार यांनी ग्रंथालय चळवळ आणि ज्येष्ठांची जबाबदारी याविषयी चिंतन या सदरात मराठी साहित्य हे आपले टॉनिक असल्याचे स्पष्ट केले. संघाचे पदसिद्ध मार्गदर्शक श्यामसुंदर सावंत देसाई यांनी ग्रंथालय चळवळ गतिमान करताना गाव तेथे ज्येष्ठ नागरिक संघ ही फेसकॉमची संकल्पना कृतीत आणण्याची गरज प्रतिपादन केली.प्रतीक्षा भिसे आणि रूपेश साळवी यांनी आरोग्यसंपन्न भारत मिशन चळवळीची माहिती दिली. मेळाव्यात ऑक्टोबरमध्ये वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचा शुभेच्छा पत्र आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी अध्यक्ष मारुती आंब्रे, उपाध्यक्ष राजेंद्र कदम, प्रकाश शिंदे, मुकुंद जोशी, सुरेश शेलार, शुभांगी भावे, सुवर्णा चव्हाण, वृषाली घाणेकर, वंदना कोतवडेकर आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:29 29-10-2024