रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे येथील शेख पीरवली बाबा यांचा उरुस गुरूवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने रात्री ९ वाजता संदल व गिलाफ मिरवणूक बाजारपेठ-मुस्लिमवाडी ते शेख पीरवली दर्ग्यापर्यंत काढण्यात येणार आहे. रात्री १२ वाजता दर्ग्यात ग्यारवी शरीफचा कार्यक्रम होणार आहे.
शुक्रवार, दि. ६ रोजी दुपारी शेख पीरवली दर्गा प्रांगणात नियाज (महाप्रसाद) होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता नंगडेपीर व हसनपीर बाबांच्या उरुसानिमित्त बाजारपेठ येथून मानकऱ्यांच्या घरापासून दर्गापर्यंत संदल व गिलाफ मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री दोन्ही दर्ग्यांत ग्यारवी शरीफचा कार्यक्रम होणार आहे. रात्री ८ वाजता नंगडे पीर बाबा दर्गा परिसरात नियाज (महाप्रसाद) होणार आहे. त्यानंतर लकी ड्राॅ सोडत व करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे.
शनिवार, दि. ७ रोजी सकाळी १० वाजता उत्कर्ष मंडळ येथे शेख पीरवली बाबा उरुस कमिटीतर्फे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. दुपारी १२ वाजता हसनपीर बाबा दर्गा परिसरात नियाज (महाप्रसाद) होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता ‘हजरत सय्यद गयासुद्दीन चिश्ती’ यांच्या उरुसानिमित्त सायंकाळी ७ वाजता संदल व गिलाफ मिरवणूक व त्यानंतर नियाज (महाप्रसाद) होणार आहे. रात्री प्रसिद्ध कव्वाल ताैसिफ जुनेदी (पुणे) यांचा कव्वालीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन शेख पीरवली बाबा उरुस कमिटीतर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:28 02-02-2026














