अजितदादांच्या अस्थीकलशाचे सावर्डेत दर्शन

सावर्डे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष व उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या अस्थीकलशाचे दर्शन सोमवारी सावर्डे येथे आमदार शेखर निकम यांच्या संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी घेतले. यावेळी जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी अजित पवार यांना आदरांजली वाहिली.

यावेळी आमदार शेखर निकम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, माजी सभापती पूजा निकम व अन्य पदाधिकाऱ्यांनी अस्थीकलशाचे दर्शन घेत अजित दादांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. आमदार निकम यांनी, यापुढे स्व. अजितदादा पवार यांच्या विचारानुसार वाटचाल करूया आणि त्यांनी दिलेला धडा कायम लक्षात ठेवून पुढे जाऊया, असे आवाहन करून आठवणी सांगितल्या. यावेळी सर्वांनी आदरांजली वाहिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 03/Feb/2026