Chiplun : पोफळी आकूसखाँ बाबा यांचा उद्या वार्षिक ऊरूस कार्यक्रम

चिपळूण : तालुक्यातील पोफळी येथील कोकणात प्रसिद्ध असलेल्या हजरत पीर आकूसखाँ बाबा उर्फ सिकंदर अलीशाह यांचा वार्षिक उरूस ४ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. यंदा शबे मेराज बडी रात्र असल्यामुळे उरूस कार्यक्रम तीन दिवस चालणार असल्याची माहिती उरूस कमिटी पोफळी सय्यदवाडी आकूसखाँनगर यांनी दिली.

हजरत पीर आकूसखा बाबा यांच्या दर्शनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. नवसाला पावणारे बाबा म्हणून त्यांची ओळख असून, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणूनही या दर्याचे विशेष महत्त्व आहे. उरूसानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार सोमवारी रात्री १० वाजता सुन्नी जामा मशीद येथून संदल शरीफचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य उरूस कार्यक्रम ४ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. यानिमित्त प्रसिद्ध कव्वाल अदनान नाजा आणि इंतेजार चिश्ती यांच्यात कव्वालीचा मुकाबला होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 03/Feb/2026