Accident : मुंबई-गोवा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पारस आईस फॅक्टरीसमोर अज्ञात अवजड वाहनाच्या धडकेत मनिष (राजू) मोहन धाडवे (४०, रा. परशुराम दुर्गेवाडी, ता. चिपळूण) यांचा मृत्यू झाला. ते परशुराम दुर्गेवाडी येथील घरी परतत असताना मुंबई-गोवा महामार्गावर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात अवजड वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. धडकेनंतर वाहनाचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने कवटी फुटून डोके व चेहरा चिरडला गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी फिर्यादी संदीप गंगाराम साळवी (५०, रा. पिरलोटे बेलवाडी, ता. खेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 03/Feb/2026