राजापूर : पाचल श्रीराम सेवक मंडळ व राजापूर पूर्व विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन १८ व १९ फेब्रुवारी रोजी पाचल येथे केले आहे. यानिमित्त प्रतिमा पूजन, वक्तृत्व स्पर्धा, दुर्गादौड, किल्ला बनविणे स्पर्धा (पाचल गाव मर्यादित एक शाळा, एक किल्ला), बाईक रॅली, कीर्तन-पोवाडा तसेच पारंपरिक पद्धतीने शिवजयंती सोहळा आयोजित केला आहे. वक्तृत्व स्पर्धेचे विषय गट १ ते ७ साठी मी किल्ला बोलतोय, गट ८ ते १५ साठी महाराजांच्या मोहिमा आणि गनिमी कावा असे आहेत. यानिमित्त प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्री काशीनाथ महाराज माने यांचे कीर्तन-पोवाडा आयोजित करण्यात आले असून, त्यातून शिवरायांचे शौर्य, स्वराज्याची संकल्पना आणि मराठी संस्कृतीचा गौरव प्रभावीपणे मांडला जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 03/Feb/2026














