नवी दिल्ली: वाढते प्रदूषण ही आता केवळ पर्यावरणीय समस्या राहिलेली नाही तर ती आता एक राष्ट्रीय आरोग्य आणीबाणी झाली आहे. त्यामुळे या मुद्द्यावर संसदेत चर्चा होणे गरजेचे असून, केंद्राने ठोस पावले उचलण्याची गरज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली.
प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात उपाययोजनांसाठी संसाधने उपलब्ध करून देण्याची मागणी रविवारी गांधी यांनी केली.
प्रदूषणासारख्या गंभीर मुद्द्यावर गेल्या काही दिवसांत भारतीय नागरिकांनी हजारो संदेश पाठवले आहेत. त्यात विशेषत: मुले, वृद्ध आणि कुटुंबाच्या आरोग्याबाबतची चिंता ठळकपणे पुढे येत आहे. भारतीय नागरिकांना केवळ पोकळ आश्वासने किंवा अहवाल नको आहेत. त्यांना स्वच्छ हवा हवी असल्याचे फेसबुक या सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये राहुल गांधींनी नमूद केले.
उल्लेखनीय बाब म्हणजे गत आठवड्यातही राहुल गांधींनी साेशल मीडियाद्वारे वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्यावर व देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असून, या समस्येमुळे लहान मुले व वृद्धांना सर्वाधिक फटका बसत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 03-02-2026














