Donald Trump : भारत-अमेरिकेत करार! भारतावरील टॅरिफ 25 वरुन 18 टक्क्यांवर..

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi On Tariff) यांच्याशी फोनवरून संवाद साधल्यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराची घोषणा केली.

या करारानुसार, अमेरिका भारतावरील कर 25 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी करणारअसल्याचेजाहीरकेलंय. या घडामोडीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) ट्विटरवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे शुल्क कमी केल्याबद्दल आभार मानले आहे.

PM Modi On Tariff : ‘भारताच्या 1.4 अब्ज जनतेच्या वतीने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे खूप खूप आभार’

“आज माझे प्रिय मित्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोलणे खूप छान वाटले. मेड इन इंडिया उत्पादनांवर आता 18% शुल्क आकारले जाईल याचा आनंद झाला. या अद्भुत घोषणेबद्दल भारताच्या 1.4 अब्ज जनतेच्या वतीने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे खूप खूप आभार,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. जेव्हा दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही एकत्र काम करतात तेव्हा ते आपल्या लोकांना लाभदायक ठरते आणि परस्पर फायदेशीर सहकार्यासाठी प्रचंड संधी उपलब्ध करून देते. जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे नेतृत्व अत्यंत महत्त्वाचे आहे. शांततेसाठी त्यांच्या प्रयत्नांना भारत पूर्णपणे पाठिंबा देतो. आपली भागीदारी अभूतपूर्व उंचीवर नेण्यासाठी मी त्यांच्यासोबत जवळून काम करण्यास उत्सुक आहे,’ असे ते पुढे म्हणाले.

Donald Trump : व्यापार करारावर सहमती

ट्रम्प यांनी असाही दावा केला की, पंतप्रधान मोदींच्या विनंतीवरून आणि परस्पर मैत्रीवर आधारित, भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार झाला आहे. या करारांतर्गत, अमेरिका भारतावरील परस्पर शुल्क 25 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी करेल, तर भारत अमेरिकेविरुद्धचे त्यांचे शुल्क आणि नॉन-टॅरिफ अडथळे शून्यावर आणण्याच्या दिशेने वाटचाल करेल. ट्रम्प यांच्या मते, भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल आणि त्याऐवजी अमेरिका आणि व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करेल.

Donald Trump PM Modi : ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवरून केली चर्चा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (2 फेब्रुवारी 2026) पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरून चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी व्यापारासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी झालेल्या संभाषणाबाबत त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एक सविस्तर निवेदन प्रसिद्ध केले. ट्रम्प यांनी लिहिले की, “आज सकाळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलणे हा सन्मान होता. ते माझे सर्वात चांगले मित्र आहेत आणि त्यांच्या देशातील एक शक्तिशाली आणि आदरणीय नेते आहेत.”

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 03-02-2026