Amol Mitkari on Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहिण योजने’ला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव द्या : अमोल मिटकरी

Amol Mitkari on Ladki Bahin Yojana : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी एक मोठी मागणी केलीये. महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने’ला (Ladki Bahin Yojana) दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे ( Ajit Pawar) नाव देण्याची मागणी आमदार मिटकरींनी केली आहे.

अजितदादांच्या दुरदृष्टीतून आलेल्या या योजनेला ‘अजितदादांची लाडकी बहिण योजना’ असं नाव देत त्यांच्या स्मृती सरकारने वेगळ्या पद्धतीने जपाव्यात, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलीये. अजितदादांना (Ajit Pawar Death) ही सरकार आणि राज्यभरातील लाडक्या बहिणींची ही आगळीवेगळी आदरांजली ठरणार असल्याचं आमदार अमोल मिटकरी म्हणालेय.

Eknath Shinde On Ladki Bahin Yojana : लवकरच 2100 रुपये देणार

दरम्यान, राज्यातील लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय एकनाथ शिंदे थांबणार नाही. दर महिन्याला ओवाळणी देणारा हा भाऊ आज विनंती करायला आला आहे. लाडक्या बहिणींना आम्ही लवकरच 2100 रुपये देणार आहोत असं आश्वासन उपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी दिलंय. तरदुसरीकडे लाडकी बहीण योजनेसाखऱ्या योजनांमुळे (Ladki Bahin Yojana) राज्यांची महसुली तूट वाढत आहे, महाराष्ट्र हे महसुली तुटीमध्ये गेलं असल्याचं निरीक्षण यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालात मांडण्यात आलं.


Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणी’मुळे राज्यात महसुली तूट, तिजोरीवर मोठा भार

दरम्यान, जून 2024 ला जेव्हा योजना सुरु झाली, तेव्हापासूनच ती वादात आणि राजकारणात अडकून आहे. कधी नावं कपात केल्यामुळे, कधी ई-केवायसीमुळे, तर कधी इतर विभागाचे निधी योजनेसाठी वळवल्यामुळे. कारणं काहीही असो.. वाद कितीही असो.. योजना बंद केली जाणार नाही असं महायुती सरकारनं स्पष्ट केलंय. लाडक्या बहिणींना महिन्या पैसे मिळत राहणार असं सत्तेत बसलेला प्रत्येक नेता आजही सांगतोय. खरंतर, लाडकी बहीण योजनेमुळे आर्थिक ताण वाढल्याचं अजित दादांच्या अर्थखात्यानं पत्रक काढून सांगितलं होतं. पण, तरीही योजनेवर कोणतंही संकट येणार नाही याची काळजी मात्र अजितदादांनी घेतली होती. अशातच आता या योजनेला अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी आमदार अमोल मिटकरींनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 03-02-2026