रत्नागिरी : तालुक्यातील सांडेलावगण येथील तरुणाने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवार 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.30 वा. सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यता आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संतोष यशवंत पवार (36, रा. सांडेलावगण वाकणवाडी, रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचा भाउ राकेश यशवंत पावरने जयगड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, संतोष हा अविवाहित असून तो विभक्त एकटाच रहात होता. सन 2013 साली अपघातात त्याचा पाय तुटल्याने तो एका पायाने अपंग झाला होता. तसेच त्याला दारुचे व्यसन असल्यामुळे तो नेहमी दारुच्या नशेत असायचा. रविवार 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.30 वा. सुमारास राकेश हा संतोष रहात असलेल्या रुमच्या शेजारील देवघरातील लाईट लावण्यासाठी जात होता. त्यावेळी त्याला संतोष त्याच्या खोलीत छताच्या वाशाला दोरी बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:14 PM 03/Feb/2026














