चिपळूण : शहरातील बुरुमतळी परिसरात सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि क्रेटा कार यांच्यात अपघात झाला. पाग परिसराकडून येणाऱ्या हडकणी-चिपळूण एसटी बसने समोरून धडक देत क्रेटा कारला काही अंतर फरफटत नेले. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले.
हा अपघात चिंचनाका ते पाग पॉवर हाऊस मुख्य रस्त्यावर घडला. धडकेनंतर क्रेटा कारचा मागील भाग रस्त्याच्या कडेला असलेल्या कंपाऊंडला जाऊन अडला, तर कारच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर काही वेळासाठी या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. दरम्यान, अपघातग्रस्त क्रेटा कार ही मिरजोळी येथील जावेद दलवाई यांची असून तेच चालवित होते. अधिक तपास पोलिस करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 AM 04/Feb/2026














