चिपळूण : येथील सह्याद्री रँडोनिअर्स या ऑडक्स क्लबतर्फे आयोजित पाटण पेनूर (पंढरपूर) – पाटण ६०० किमी बीआरएम पूर्ण डॉ. मनीषा वाघमारे यांनी एकाच वर्षात तिसऱ्यांदाचा सुपर रँडोनिअर (एसआर) बनण्याचा बहुमान पटकावला आहे. एकाच वर्षात २००, ३००, ४००, ६०० किमी बीआरएम पूर्ण केल्यानंतर (एसआर)(सुपर रैंडोनिअर) हा किताब मिळतो.
डॉ. वाघमारे या चिपळूण सायकलिंग क्लबच्या अग्रणी महिला रायडर आजवर अनेक सायकलिंग इव्हेंटमध्ये भाग घेऊन आपला ठसा उमटवला आहे. पहिली एसआर सीरिज पूर्ण केल्यानंतर १ हजार किमी बीआरएम पूर्ण करून ही बीआरएम पूर्ण करणारी कोकणातील पहिली महिला रायडर बनण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.
डॉ. वाघमारे यांचा ट्रिपल एसआरचा प्रवास ५ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू झाला. १८ नोव्हेंबरला ३००, २ डिसेंबरला ४०० तर अवघ्या ४१ दिवसांत म्हणजे १६ डिसेंबर २०२३ ला ६०० किमी बीआरएम पूर्ण करून त्या पहिल्यांदा सुपर रॅडोनिअर झाल्या. पाठोपाठ १००० किमी बीआरएम पूर्ण करून त्यांनी इतर महिला रायडर्सना हुरूप यावा, सोबत मिळावी यासाठी २१ जानेवारी २०२४ ला दुसरी सीरिज सुरू केली. पाठोपाठची ३००, ४०० पूर्ण करत असतानाच नियोजित कार्यक्रमामुळे ६००ची बीआरएम हुकली; परंतु तिथेच न थांबता त्यांनी १८ मे रोजी २०० किमी नाईट बीआरएम करून तिसऱ्या बीआरएम सीरिजला सुरवात केली. २८ सप्टेंबरला ६०० पूर्ण करून डबल एसआर होतानाच तिसऱ्या सीरिजच्या तीन बीआरएम त्यांच्या खाती जमा होत्या. २६ ऑक्टोबरची ६०० किमी पूर्ण करून एकाच वर्षात तीनवेळा सुपर रँडोनिअर बहुमान मिळवणाऱ्या त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या एकमेव महिला रायडर बनल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:14 PM 29/Oct/2024














