अजित पवार यांच्या अस्थींचे गुहागरातील समुद्रात विसर्जन

गुहागर : विमान अपघातामध्ये निधन झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थी सोमवारी गुहागर येथे आणण्यात आल्या. राष्ट्रवादीचे पदाधिकारी, ग्रामस्थांच्या उपस्थितीत साश्रूनयनांनी गुहागर समुद्रात अस्थींचे विसर्जन करण्यात आले. अजित पवार यांच्या अस्थी सावर्डे येथे दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर या अस्थी गुहागर समुद्रामध्ये विसर्जित करण्यासाठी आणण्यात आल्या होत्या. अॅड. मनाली आरेकर यांनी समुद्र चौपाटीवरील आपल्या जागेमध्ये सदर अस्थी नागरिकांना दर्शनासाठी ठेवल्या होत्या.

यावेळी अनिरूद्ध निकम, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष साहील आरेकर, शहराध्यक्ष मंदार कचरेकर, सुजाता बागकर, नगरसेवक सौरभभागडे, दीपक शिरधनकर, श्रीधर बागकर, तुषार सुर्वे, प्रसाद विचारे, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा शलाका काष्टे, फरहान खान, राष्ट्रवादी युवा तालुकाध्यक्ष विवेक जांगळी, नगर पंचायतचे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण उपस्थित होते. अस्थी विसर्जनानंतर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 04/Feb/2026