MAHATET Result: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर!

मुंबई : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२५चा अंतिम निकाल राज्य परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आला आहे. या अंतिम निकालामध्ये फक्त ११.२८ टक्के शिक्षक उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.

पावणे पाच लाख शिक्षकांपैकी ३ लाख ९६ हजार शिक्षक नापास झाले आहेत.

परीक्षेचा तपशीलआकडेवारी
एकूण नोंदणी४,७५,६६९
परीक्षेस उपस्थित४,४६,७३०
उत्तीर्ण उमेदवार५०,३६९
अनुत्तीर्ण उमेदवार३,९६,३२५
निकालाची टक्केवारी११.२८%

एकूण ४ लाख ७५ हजार ६६९ उमेदवारांनी नोंदणी केली होती. यापैकी ४ लाख ४६ हजार ७३० उमेदवार परीक्षेला उपस्थित राहिले, तर २८ हजार ९३९ उमेदवार अनुपस्थित होते. एकूण ५० हजार ३६९ उमेदवार उत्तीर्ण झाले असून ३ लाख ९६ हजार ३२५ उमेदवार अनुत्तीर्ण ठरले आहेत. अंतिम निकालाचा टक्का ११.२८ इतका आहे.

महाटीईटी निकाल: माध्यम आणि विषयांनुसार टक्केवारी

माध्यम / विषयनिकालाची टक्केवारी (%)
कन्नड माध्यम१५.०१% (सर्वात जास्त)
सामाजिक विज्ञान१२.३३%
मराठी माध्यम१२.२०%
हिंदी माध्यम१२.१९%
तेलगू माध्यम१०.००%
गणित व विज्ञान९.१२%
बंगाली माध्यम७.२९%
उर्दू माध्यम६.९६%
इंग्रजी माध्यम५.४४%
गुजराती माध्यम३.४४%

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 04-02-2026