Sangameshwar : देवळे येथे श्री खड्गेश्वर महाशिवरात्र उत्सवाला १२ फेब्रुवारीपासून सुरुवात

संगमेश्वर : तालुक्यातील देवळे येथील श्री खड्‌गेश्वर मंदिराचा महाशिवरात्र उत्सव गुरुवार, १२ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत असून बुधवार, १८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत मोठ्या भक्तिभावात साजरा केला जाणार आहे. या उत्सव काळात देश-विदेशातून भाविक श्री खड्‌गेश्वराच्या दर्शनासाठी तसेच सेवेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. संपूर्ण उत्सव कालावधीत दररोज धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात येणार आहे.

उत्सव काळात दररोज रात्री ११ वाजेपर्यंत आरती, छबिना, मंत्रजागर, पुष्पांजली आदी धार्मिक विधी होणार आहेत. ह.भ.प. श्री ज्ञानेश जोशी (धानोरकर बुवा), पुणे यांचे कीर्तन होणार असून संवादिनी साथ हेमंत देशमुख (रत्नागिरी) आणि तबला साथ सुधीर जोशी (ऊगार) देणार आहेत.

उत्सव कार्यक्रम रूपरेषाः
गुरुवार, १२ फेब्रुवारी

रात्री ८ वा. मंत्रजागर ९ ते ११ वा. आरती व छबिना रात्री कीर्तन पुष्प १
शुक्रवार, १३ फेब्रुवारी
पहाटे ३ वा. पाठांतर व सूर्यनमस्कार स्पर्धा (पंचक्रोशी मर्यादित) रात्री ११ वा. कीर्तन पुष्प २
शनिवार, १४ फेब्रुवारी
दुपारी ३ ते ४ वा. वार्षिक सभा सायंकाळी ४ ते ६ वा. कीर्तन पुष्प ३ सायंकाळी ६ ते ७.३० वा. काव्य मैफिल (कवितांगण ग्रुप, देवळे) रात्री ११ वा. मराठी-हिंदी गाण्यांचा कार्यक्रम (स्वर संध्या, रत्नागिरी)
रविवार, १५ फेब्रुवारी – महाशिवरात्र
सायंकाळी ५.३० ते ९ वा. कै. सुधाकर वळामे स्मृती भजन सेवा स्पर्धा व बक्षीस वितरण रात्री ११ ते २.३० वा. आरती व छबिना पहाटे २.३० ते ४.३० वा. कीर्तन पुष्प ४
सोमवार, १६ फेब्रुवारी
सायंकाळी ४ ते ६ वा. कीर्तन पुष्प ५
रात्री ११ वा. दोन अंकी विनोदी नाटक “लव लग्न लोच्या” (श्रीरंग, रत्नागिरी)
मंगळवार, १७ फेब्रुवारी
सायंकाळी ४ ते ६ वा. कीर्तन पुष्प ६
रात्री ११ वा. “जोडी तुझी माझी” (होम मिनिस्टर) खुल्या गटातील स्पर्धा
बुधवार, १८ फेब्रुवारी
दुपारी १२.३० ते २.३० वा. महाप्रसाद


महाशिवरात्र उत्सवातील सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन खड्‌गेश्वर संस्थावर्धक मंडळी, अध्यक्ष श्रीकांत वळामे, कार्यवाह सुबोध करकरे आणि निमंत्रक बन्सी आठल्ये यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 04/Feb/2026