आजचे राशीभविष्य – ५ फेब्रुवारी २०२६

मेष – आजचा दिवस दूरगामी आर्थिक योजनेसाठी अनुकूल आहे. तसेच आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया फायदेशीर आहे. शारीरिक व मानसिक उत्साहाचा अनुभव होईल. मित्र – स्वकीयां कडून भेटवस्तू मिळतील.

त्यांच्या सहवासात वेळ आनंदात जाईल.

वृषभ – आज आपल्या बोलण्याच्या जादूने कोणी प्रभावीत झाल्याने आपलाच फायदा होईल, तसेच मधुर व सौम्य वक्तव्याने नवे संबंध प्रस्थापित व्हायला मदत होईल. शुभ कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. वाचन – लेखन ह्या सारख्या साहित्य प्रकारात अभिरुची वाढेल.

मिथुन – आज महत्त्वाचा निर्णय घेताना आपली द्विधा मनःस्थिती होईल. आई व स्त्रीयांच्या बाबतीत संवेदनशील व्हाल. विचारांची भाऊगर्दी मानसिक थकवा निर्माण करेल. निद्रानाश झाल्याने प्रकृती बिघडेल. शक्यतो प्रवास टाळा.

कर्क – आज शारीरिक व मानसिक उत्साहा बरोबर घरातील वातावरणही आनंदी असेल. मित्र – स्नेहीजन ह्यांचा सहवास घडेल. मित्रांकडून लाभ होईल. मंगल कार्याची सुरूवात करायला आजचा दिवस अनुकूल आहे. कामातील यश व प्रिय व्यक्तीचा सहवास ह्यामुळे आपण आनंदी राहाल. आर्थिक लाभ संभवतो.

सिंह – आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आजचा दिवस कुटुंबियांसह सुख शांतीत घालवाल. त्यांचे सहकार्य मिळेल. स्त्री मित्रां कडून विशेष मदत प्राप्त होईल. दूरचे मित्र व स्नेही यांच्याशी संपर्क फायदेशीर ठरेल. आपल्या प्रभावी संभाषणाने लोकांचे लक्ष वेधून घ्याल.

कन्या – आजच्या लाभदायक दिवसाने वैचारिक समृद्धी वाढेल. वाकचातुर्य व मधुरवाणी ह्यांच्या साह्याने मैत्रीपूर्ण संबंध विकसीत करू शकाल. उत्तम भोजन, भेटवस्तू, वस्त्र इत्यादींची प्राप्ती होईल. शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य टिकून राहील.

तूळ – आज थोडा सुद्धा असंयम व अवैध व्यवहार आपणास अडचणीत आणेल. एखादी दुर्घटना संभवते. बोलण्यातील शिथीलता उग्र तक्रार वाढवण्याची शक्यता आहे. सगे सोयरे यांच्याशी पटणार नाही. मनोरंजन तसेच फिरण्यात पैसे खर्च होतील.

वृश्चिक – आज आपल्या कौटुंबिक जीवनात सुख – शांती नांदेल. पत्नी व संतती कडून चांगल्या बातम्या मिळतील. मंगलकार्ये ठरतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. नोकरी – व्यवसायात संधी मिळून उत्पन्न वाढेल.

धनु – आजचा दिवस कार्य साफल्याचा आहे. नवे काम सुरू कराल. मैत्रिणींकडून लाभ होईल. नोकरीत वरिष्ठ अधिकारी आपल्या बढतीचा विचार करतील. गृहजीवनात आनंद व समाधान मिळेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळेल. आर्थिक लाभ होतील.

मकर – आज बौद्धिक कार्य व व्यवसायात आपण नवी शैली वापराल. साहित्य व लेखन कार्याला गती मिळेल. शारीरिक अस्वास्थ्य व थकवा जाणवेल. संततीची समस्या चिंता वाढवील. दूरचे प्रवास घडतील.

कुंभ – आज निषेधात्मक व नकारात्मक विचारां पासून दूर राहावे. वाद, भांडणे ह्या पासून दूर राहा. राग व बोलण्यावर संयम ठेवा. कौटुंबिक वातावरण कलुशित राहील. आर्थिक चणचण जाणवेल. खूप विचार केल्याने मानसिक थकवा जाणवेल.

मीन – दैनंदिन कामातून बाहेर पडून आज आपण सहलीसाठी किंवा मनोरंजनासाठी वेळ द्याल. स्वजनांसह सहलीस जाऊ शकता. सिनेमा, नाटक किंवा बाहेर भोजन करणे असा एखादा कार्यक्रम आखाल. कलावंत किंवा कारागीरांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. व्यवसायात भागीदारी साठी अनुकूलता लाभेल.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 05-02-2026