मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे हे अनेक सुपरहिट चित्रपट आणि मालिकांसाठी ओळखले जातात. त्यांचा भाऊ मंदार शिंदे ही एकेकाळी कलाविश्वात सक्रिय होता आणि अनेक मालिकांचे यशस्वी दिग्दर्शन केले.
मात्र लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच मंदार शिंदेंच्या आयुष्यात अचानक वेगळाच टर्न आला.
मंदार शिंदे हे शाहीर साबळे यांचे नातू आहेत. नुकतीच त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली, जिथे त्यांनी अनेक खास गोष्टी उघड केल्या. या मुलाखतीत मंदार शिंदे म्हणाले, ‘केदार शिंदेला मी त्याचा भाऊ आहे हे मला माहितच नव्हतं.’
मंदारने सांगितले की, ‘लहानपणापासूनच माझं आजोबांच्या (शाहीर साबळे) घरी जाणं होतं. केदार दादा लहानपणापासून तिथेच राहत होता. मी माझ्या आईच्या घरी काळाचौकीला जन्माला आलो आणि तिथेच वाढलो. आई दररोज मला परेल व्हिलेजमधल्या आजोबांच्या घरी घेऊन जायची. तिथे केदार दादाही असायचा. आम्ही दोघे वेगवेगळ्या शाळेत शिकत होतो तो आर.एम. भटमध्ये आणि मी दादारच्या किंग जॉज स्कूलमध्ये. जवळजवळ 5-6 वर्ष आम्हाला माहितीच नव्हती की आम्ही सख्खे भाऊ आहोत. कारण आमच्या आई-बापांचे वलय वेगळे होते. सुमारे 5-7 वर्षांनी केदार दादाला कळले की मी त्याचा सख्खा भाऊ आहे. पण आमच्यात कायम अंतर राहिले.’
मंदार शिंदे यांनी अनेक मालिकांचे दिग्दर्शन उत्कृष्टरीत्या सांभाळले, पण काही वर्षांपूर्वी त्यांच्या आयुष्यात एक मोठा टर्न आला. त्यांच्या मुलाचा गंभीर अपघात झाला, ज्यात मुलगा गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर मंदार शिंदेंच्या आयुष्यात सर्व प्राथमिकता बदलली आणि ते आता कलाविश्वात फारसे सक्रिय नाहीत. त्यांच्या दैनंदिन जीवनात आता कुटुंबाची काळजी आणि मुलाची देखभाल यांना सर्वाधिक महत्त्व आहे.
सध्या मंदार शिंदे एका व्यावसायिकाचे ड्रायव्हर म्हणून काम करत आहेत. त्यांनी आपल्या मुलाच्या काळजीने आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना आयुष्याचा नवीन मार्ग स्वीकारला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 05-02-2026














