बेसमेंट, पार्किंग स्वतंत्र युनिट म्हणून विकू शकत नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

मुंबई : तळघर (बेसमेंट) आणि पार्किंग क्षेत्रे ही सामायिक सुविधा (कॉमन ॲमेनिटीज) असल्याने ती स्वतंत्र युनिट्स म्हणून विकता येणार नाहीत किंवा त्याच्या आधारे सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सदस्यत्व मागता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले.

बेसमेंट, पार्किंग जागेची स्वतंत्र विक्री बेकायदा फेटाळून लावत, इमारतीच्या तळघर (बेसमेंट) खरेदीदाराला दिलेले सदस्यत्व रद्द करणारा राज्य सरकारचा आदेश कायम ठेवला. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमांतर्गत, नोंदणीकृत विक्रीखताद्वारे जरी बेसमेंट किंवा पार्किंगच्या जागेची मालकी मिळवली असली, तरी त्यावरून सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सदस्यत्व मिळू शकत नाही, असा निर्णय न्यायालयाने दिला.

रलेल्या एका निवासी प्रकल्पासंदर्भात न्यायालयाने वरील निर्णय दिला. जानेवारी २०१६ मध्ये भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळाल्यानंतर आणि २०१९ मध्ये गृहनिर्माण संस्था स्थापन झाल्यानंतर, विकासकाने संपूर्ण बेसमेंट आणि पार्किंग क्षेत्रे एका जवळच्या कुटुंबीयाकडे करारांद्वारे (त्यात नोंदणीकृत विक्रीखताचाही समावेश आहे.) हस्तांतरित केल्याचे उघड झाले. या हस्तांतरणाच्या आधारे खरेदीदाराने संस्थेचे सदस्यत्व मागितले आणि संस्थेने उत्तर न दिल्याने अधिनियमाच्या कलम २२(२) अंतर्गत ‘गृहीत सदस्यत्व’ (डीम मेंबरशिप) लागू होते, असा युक्तिवाद केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:06 05-02-2026