आजचे राशीभविष्य – ६ फेब्रुवारी २०२६

मेष – आजचा दिवस आनंददायी आहे. आर्थिक लाभ झाल्याने गुंतवणुकीशी संबंधित योजना यशस्वीपणे पूर्ण होतील. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील. जनसंपर्क वाढेल. आपल्या व्यावसायिक क्षेत्रा बाहेरील लोकांशी सुद्धा संपर्क होईल.

बौद्धिक कार्यात रुची वाढेल.

वृषभ – आज वैचारिक पातळीवर थोरपणा व गोड वाणी ह्यामुळे इतरांना प्रभावित करू शकाल. तसेच त्यांच्याशी संबंधात सुसंवाद निर्माण करू शकाल. बैठका, चर्चा ह्यात सुद्धा आपणाला यश मिळेल. कष्टाचे अपेक्षित फळ मिळाले नाही तरी सुद्धा आपण त्या क्षेत्रात प्रगती पथावर राहाल.

मिथुन – आज मनाची स्थिती दोलायमान राहील. मन द्विधा बनेल. जादा हळवेपणा मनाला बेचैन करेल. आई विषयी अधिक भावनाशील व्हाल. बौद्धिक चर्चेचे प्रसंग येतील पण त्यात वादविवाद टाळावेत.

कर्क – शारीरिक व मानसिक उत्साहा बरोबर घरातील वातावरण सुद्धा आनंदी असेल. मित्र व स्नेहीजन ह्यांचा सहवास घडेल. मित्रां कडून लाभ होईल. मंगल कार्याची सुरूवात करायला आजचा दिवस अनुकूल आहे. कामातील यश व प्रियव्यक्तीचा सहवास ह्यामुळे आपण आनंदीत राहाल.

सिंह – आजचा दिवस मध्यम फलदायी असला तरी आर्थिक दृष्टया लाभदायी आहे. खर्च मात्र वाढतील. सर्वदूर असणार्‍या लोकांचे निरोप येतील व व्यवहारातून लाभ होतील. घरातील व्यक्तींकडून चांगले सहकार्य मिळेल. मित्र – मैत्रिणी सुद्धा मदत करतील.

कन्या – आज आपल्या वैचारिक समृद्धी व मोहक वाणी ह्यामुळे लाभ होऊन सौहार्दपूर्ण संबंध वाढवून काम पूर्ण कराल. आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक आहे. प्रकृती उत्तम राहील व मन सुद्धा प्रसन्न राहील.

तूळ – आज आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अविचारी वर्तनाने अडचणीत याल. एखादा अपघात संभवतो. अचानकपणे खर्चात वाढ होईल. व्यावसायिक व्यक्तींशी मतभेद होतील. वाणीवर संयम ठेवावा लागेल. वाद टाळावेत.

वृश्चिक – आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी – व्यवसायात फायदा होईल, मित्रांचा सहवास घडेल. त्यांच्यासह निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाण्याचे बेत ठरतील. विवाहोत्सुक व्यक्तींना योग्य जोडीदार मिळेल. पत्नी व संतती कडून लाभ होईल.

धनु – आज यश, कीर्ती व प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल. कार्यक्षेत्रातील वरिष्ठ खूश असल्यामुळे पदोन्नतीची शक्यता आहे. स्वास्थ्य ठीक राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वडील तसेच सरकारकडून फायदा मिळेल. आर्थिक योजना चांगल्या प्रकारे पूर्ण कराल.

मकर – आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. बौद्धिक कार्यासाठी मात्र दिवस शुभ आहे. लेखन अथवा साहित्य विषयक कार्य व्यवस्थित पार पडेल. त्यासाठी नियोजन कराल. सरकारी कामात प्रतिकूलता जाणवेल.

कुंभ – आज आपण नकारात्मक विचारा पासून दूर राहावे. वाद, भांडणे ह्यापासून सुद्धा दूर राहावे. राग व बोलण्यावर संयम ठेवाव. कौटुंबिक वातावरण कलुशित होईल. आर्थिक चणचण जाणवेल. खूप विचार केल्याने मानसिक थकवा जाणवेल.

मीन – आज व्यापार्‍यांना उज्ज्वल भविष्य आहे. भागीदारीसाठी अनुकूल दिवस आहे. साहित्यिक, कलाकार, कारागिर आपल्या कलेला वाव देऊ शकतील. आदर मिळेल. मेजवानी, सहल ह्यातून मनोरंजन होईल. दांपत्य जीवनाचा भरपूर आनंद मिळेल.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 06-02-2026