Ramdas Kadam: अजितदादा गेल्यानंतर तटकरेंनी गलिच्छ राजकारण केल; रामदास कदमांचे गंभीर आरोप

खेड/रत्नागिरी: जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून कोकणातील राजकीय आखाडा चांगलाच पेटला आहे. शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांचा झालेला शपथविधी हा तटकरेंच्या गलिच्छ राजकारणाचा भाग असल्याचे कदम यांनी म्हटले आहे.

“सुनील तटकरे विश्वासघातकी”; रामदास कदमांचा हल्लाबोल

सुनील तटकरे यांच्यावर तोफ डागताना रामदास कदम म्हणाले की, “अजित दादांच्या चितेची आग विझली नव्हती, तोच सुनेत्रा वहिनींना शपथ घ्यायला भाग पाडले गेले. अवघे १० दिवस थांबले असते तर काय बिघडले असते? केवळ शरद पवार पक्षाचा ताबा घेतील, या भीतीने तटकरेंनी हे गलिच्छ राजकारण केले आहे. महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही.”

कदमांनी केलेले इतर गंभीर आरोप:

  • राजकीय संपत्ती: तटकरेंनी ज्यांनी त्यांना मोठे केले, त्यांनाच संपवण्याचे काम केले.
  • दगाफटका: लोकसभेत मी त्यांना निवडून आणण्यास मदत केली, मात्र त्यांनीच माझा मुलगा योगेश कदम याला पाडण्याचे प्रयत्न केले.
  • निंदनीय कृती: सुनेत्रा वहिनींना घाईघाईत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावणे ही तटकरेंची कृती निंदनीय आहे.

भास्कर जाधवांचाही घेतला समाचार; केला धक्कादायक गौप्यस्फोट

आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना रामदास कदम यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले. जाधव यांच्या ‘सडलेला मेंदू’ या टीकेचा समाचार घेताना कदम म्हणाले, “भास्कर जाधवांचा तोल गेला आहे. गुहागर मतदारसंघात पराभव दिसत असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना चांगल्या डॉक्टरची गरज आहे.”

कदम यांनी पुढे एक मोठा गौप्यस्फोट केला:

“१९९५ ला भास्कर जाधवांना आमदारकीची सीट मी मिळवून दिली, त्यांना शिवसेनेत मी आणले. माझ्या गावातील एका भक्ताकडे भास्कर जाधव यांची पत्नी यायची. मी ‘विद्या’ केली असे म्हणणाऱ्या जाधवांनी ते सिद्ध करून दाखवावे.”


निवडणुकीच्या तोंडावर कोकणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

नेत्याचे नावप्रमुख आरोप / विधान
रामदास कदमसुनील तटकरे विश्वासघातकी आहेत; सुनेत्रा पवारांचा शपथविधी हा राजकीय स्वार्थ होता.
भास्कर जाधवरामदास कदम यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून ते विकृती आहेत. (जाधवांची पूर्वटीका)
रामदास कदम (जाधवांना उत्तर)भुंकणाऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही; भास्कर जाधवांचा मेंदू सडला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:30 06-02-2026