रत्नागिरी : शहरातील मुरुगवाडा पांढरा समुद्र येथे पोलीस पथकाने मोठी कारवाई करत ब्राऊन शुगर, गांजा बाळगणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 182 ग्रॅम ब्राऊन हेरॉईन (किंमत. 4,00,400/- रुपये) व 52.5 ग्रॅम गांजा (किंमत 1,050/- रुपये) व इतर साहित्य असे एकूण 4,43,200/- रुपये किंमतीचा माल पोलिसांनी हस्तगत केला. करमजीत सिंह जनरेल सिंह, मोहन सिंह भाट अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवार 28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी रत्नागिरी शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. सतिश शिवरकर आपल्या सहकाऱ्यांसह तसेच गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पोउनि / श्याम आरमाळकर, सपोफौ/दिपक साळवी, पोलीस हवालदार अमोल भोसले, अरुण चळके, राहुल जाधव, पंकज पडेलकर, अशिष भालेकर, पोलीस नाईक भालचंद्र मयेकर, पोलीस शिपाई अमित पालवे व कौस्तुभ जाधव हे शहरातील मुरुगवाडा पांढरा समुद्र येथे गस्त घालत असताना दोन संशयित दिसून आले. त्यांच्या हालचालीवरून पोलिसांना संशय आल्याने त्या दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी आपले नाव करमजीत सिंह जनरेल सिंह, मोहन सिंह भाट असे सांगितले. दोघांना शहर पोलीस ठाण्यात आणून त्यांची तपासणी केली तेंव्हा, त्यांचे ताब्यात 182 ग्रॅम ब्राऊन हेरॉईन (कीमत. 4,00,400/- रुपये) व 52.5 ग्रॅम गांजा (कीमत. 1,050/- रुपये) व इतर साहित्य असे एकूण 4,43,200/- रुपये किंमतीचा माल मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.
दोघांवर रत्नगिरी शहर पोलीस ठाणे येथे NDPS Act. 1985 चे कलम 8 (क), 20 (ब) (ii) (अ), 22(ब), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:49 PM 29/Oct/2024