रत्नागिरी : पावसाळा संपल्यानंतर कोकण किनारपट्टी भागात आंबा आणि काजूच्या बेगमीच्या प्राथमिक कामांना सुरवात होईल.
त्यामुळे उन्हाचा ताप जसजसा वाढत जाईल तशी फवारणीची सत्रे सुरू होतील. आंबा, काजू फळबागेत कीटकनाशकाची फवारणी मानवी आरोग्याला घातक असल्यामुळे फवारणी करताना संरक्षक कीट वापरावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील बागायतीचा हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर बागायतदारांना साफसफाईला सुरवात करण्यात आली आहे. काहींनी कीटकनाशकांची पहिली फवारणी सुरू केली आहे. फवारणी करताना वार्याची दिशा, तापमान लक्षात घ्यावे. फवारणी करताना धूम्रपान कटाक्षाने टाळावे. फवारणी करून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने हात धुवावेत जेणेकरून कीटकनाशकांचा स्पर्श झाला असल्यास होणारा अपाय टाळता येईल. फवारणी करताना काळजी घेऊन होणारे अपघात टाळून यंदाचा हंगाम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने केले आहे. हापूस आंब्यावरील किडी व रोगांच्या नियंत्रणाखाली घेतल्या जाणाऱ्या कीटकनाशकांच्या फवारण्या सुरू झाल्या आहेत. ही कीटकनाशके कीड व रोग नियंत्रणासाठी उपयुक्त असली तरी मनुष्यासाठी अपायकारक असल्याने ती फवारताना शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच मजुरांची काळजी घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. कीटकनाशके ही परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावीत. कीटकनाशके वापरण्यात येणाऱ्या पिकासाठी लेबल क्लेम असल्याची खात्री करावी. कीटकनाशक खरेदीचे पक्के बिल घेऊन जपून ठेवावे, अशी सूचना कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:29 29-10-2024