◼️ 20 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
रत्नागिरी : राज्यातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या व संस्थेमध्ये 51 टक्के पेक्षा जास्त बौध्द समाजातील विश्वस्त / सदस्यांची संख्या असलेल्या बौध्द समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य राबविणा-या संस्थांना पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी 10 लाख रुपयापर्यंत अनुदान योजना सन 2025-26 साठी प्रस्ताव 20 फेब्रुवारी 2026 पूर्वी जिल्हा अल्पसंख्याक कक्ष, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, यांचेकडे सादर करावेत.
अल्पसंख्याक विकास विभाग 7 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार व अल्पसंख्याक विकास विभाग 27 जानेवारी 2026 च्या शासन परिपत्रकानुसार पात्र संस्थांनी विहित मुदतीत आपले प्रस्ताव सादर करावेत, असे जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी तथा प्र.जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील यांनी कळविले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:00 10-02-2026














