Ratnagiri: रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीची १२ फेब्रुवारीला बैठक

रत्नागिरी : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची दिशा ठरवणाऱ्या जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची बैठक गुरुवारी (ता.१२) होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी साडेअकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात ही बैठक होईल. प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील यांनी बैठकीचे अधिकृत नियोजन जाहीर केले असून, सर्व संबंधित यंत्रणांना त्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नव्या वर्षातील ही पहिलीच मोठी बैठक असल्याने या बैठकीत जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीचा विनियोग आणि पुढील आर्थिक वर्षाचा विकास आराखडा यावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. विशेषतः ग्रामीण भागातील रस्ते, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा योजना आणि पर्यटन विकासाशी संबंधित असलेल्या महत्त्वाच्या कामांचा पालकमंत्री आढावा घेणार आहेत. या बैठकीला जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक आणि सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांनंतर ही बैठक होत असल्याने तिला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. नवीन लोकप्रतिनिधींच्या निवडीनंतर जिल्ह्याच्या नियोजनात कोणकोणते नवे बदल सुचवले जातात आणि पालकमंत्र्यांनी दिलेल्या ‘विकास’ शब्दाची पूर्तता करण्यासाठी निधीचे वाटप कसे केले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
18:01 10-02-2026