चिपळूण : चिपळूण विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचारासाठी तालुक्यात पंचायत समिती गणनिहाय बैठकांचा धडाका सुरू ठेवला आहे. महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या बैठका होत आहेत. मंगळवारी एकाच दिवसात ५ पंचायत समिती गणात संयुक्त बैठका घेण्यात आल्या असून, शिवसेना ठाकरे मटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेसचे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या प्रचारात सहभागी झाले आहेत.
चिपळूण मतदार संघात चांगली ताकद असल्याने हा मतदार संघ शिवसेना ठाकरे गटाला मिळावा, अशी मागणी ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यानी केली होती. गेली दोन वर्षे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने हे देखील विधानसभेसाठी मतदार संघात पेरणी करत होते; मात्र महाविकास आघाडीच्या जागावाटपात चिपळूणचा मतदार संघ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मिळाला. त्यानुसार प्रशांत यादव यांनी महाविकास आघाडीतर्फे शरद पवार गटातून उमेदवारी दाखल करत जोरदारपणे प्रचाराला सुरवात केली आहे. पहिल्या टप्प्यात महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांची संयुक्त चर्चा झाल्यानंतर आता ग्रामीण भागात पंचायत समिती गणनिहाय बैठका घेतल्या जात आहेत. शहरात महाविकास आघाडीच्या कार्यकत्यांची बैठक घेत त्यांच्यावर बूथनिहाय प्रचाराची जबाबदारी सोपवली. तालुक्यातील कोंढे, असुर्डे, खेर्डी, सावर्डे, कुटरे येथे तर पेढे, नांदिवसे, पोफळी व टेरव पंचायत समिती गणात संयुक्त बैठका घेण्यात आल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 30/Oct/2024














