नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाटकांची महास्पर्धा

रत्नागिरी : अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद शाखा रत्नागिरीच्या वतीने घेतली जाणार उत्सवी रंगभूमीवरील नाटकांची महानाट्यस्पर्धा. रत्नागिरी तालुक्यात एकूणच जिल्ह्याभरात उत्सवाच्या निमित्ताने नाटक! अशी परंपरा अस्तित्वात आहे तिला आता दीडशे ते पावणे दोनशे वर्षांचा उदंड इतिहास आहे.

नाटक या मातीत रुजावं म्हणून असंख्य मंडळींनी अविरत श्रम घेत ही परंपरा रुजवली, वाढवली.आता तिचेच विस्तारित रूप म्हणून इथे नाटक घडतं आहे.परंतु मध्यंतरी च्या काळात या उत्सवी नाटकांना थोडीशी मरगळ आली होती ती आता झटकली जात आहे उत्सवात नाटक होऊ लागलं आहे.आता याच प्रवासाला अधिक बळकट करण्यासाठी आणि ज्या यथायोग्य सन्मानाची अधिकारी ही चळवळ आहे तो सन्मान तिला मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद शाखा रत्नागिरी सरसावत आहे. आता होणार स्पर्धा तुमच्या उत्सवात सादर होणाऱ्या नाटकाची.

रत्नागिरी तालुक्यातील सगळ्याच उत्सवांकरिता सादर होणाऱ्या नाटकांची स्पर्धा सुरू होत आहे १ नोव्हेंबर २०२४ ते १५ मे २०२५ या कालावधीत सादर होणाऱ्या नाटकांची. या स्पर्धेचे वेगळेपण असे असेल की सादरकर्त्यांना कुठेही जायचं नाही त्यांनी आपल्या उत्सवात नाटक सादर करायचं आहे.त्यांच्या परंपरेनुसार. नाट्यपरिषदेच्या वतीने दोन नामांकित परीक्षक सादरीकरणाच्या ठिकाणी येतील नाटक पहातील आणि सीलबंद निकाल अ.भा. म.ना.प.रत्नागिरीच्या कार्यालयात जमा करतील.

या स्पर्धेचा निकाल १५ मे २०२५ नंतर एका देखण्या कार्यक्रमात स्वातंत्र्यविर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे लावला जाणार आहे. निकाल उपरांत सर्वोत्तम ३ नाटकांचा महोत्सव सावरकर नाट्यगृहात आयोजित केला जाईल. तसेच या तीन संघांना रोखबक्षीस आणि आकर्षक चषक देखील दिला जाणार आहे.
प्रथम क्रमांक रुपये – ३०,०००/-
द्वितीय क्रमांक रुपये – २५,०००/-
तृतीय क्रमांक रुपये – २०,०००/-
तसेच अभिनय पुरुष ३ क्रमांक व सन्मान चिन्ह.
अभिनय स्त्री ३ क्रमांक व सन्मान चिन्ह
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ३ क्रमांक सन्मानचिन्ह

या करिता सादरकर्त्या संस्थेने नाट्यपरिषदेकडे विहित नमुन्यातील अर्ज आणि प्रवेश शुल्क रक्कम रुपये २०००/- भरावयाचे आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधून आपली नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
श्रीकांत पाटील- 9423049705
सौ. अनुया बाम (सुनीता बापट) 9284752787
श्री. अमेय धोपटकर – 8888033621

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 30-10-2024