​अमेरिकेत होणाऱ्या व्याजदर कपातीकडे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची करडी नजर

वॉशिंग्टन : जेरॉम पॉवेल यांच्या अध्यक्षतेत यूएस फेड रिझर्व्हची १७ ते १८ सप्टेंबर रोजी महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत यूएस फेडरल रिझर्व्ह प्रमुख व्याजदर कमी करण्यावर अंतिम निर्णय घेईल. यावेळी अमेरिकेची केंद्रीय बँक व्याजदर कमी करेल असे अपेक्षित आहे पण, व्याजदर कपात शेअर मार्केटसाठी सकारात्मक बातमी ठरू शकते का? केंद्रीय बँकेने मुख्य व्याजदरात कपात जाणारे शेअर बाजारासाठी चांगली बातमी मानली जाते कारण यामुळे गुंतवणूकदारांना स्वस्त भांडवल उपलब्ध होते जे बाजारात गुंतवून नफा कमावणे शक्य होते पण, परिस्थिती जरा वेगळी आहे.

अमेरिकेतील घडामोडींकडे गुंतवणूकदारांची नजर
गेल्या काही महिन्यांपासून फेड रिझर्व्हने व्याजदर कपात करावी अशी मागणी केली होती तर अखेर आता लोकांची प्रतीक्षा संपणार आहे. पण यंदा केवळ दर कपात नाही तर रेट कट किती होणार हा मोठा मुद्दा आहे कारण त्याचा परिणाम बाजारावर होईल. यूएस फेडने व्याजदरात मोठी कपात केली तर शेअर बाजारात नकारात्मक संकेत मिळतील.

फेड रिझर्व्ह यावेळी व्याजदरात २५ बेस पॉइंट्स म्हणजेच ०.२५ टक्के कपात करेल असा बहुतेक तज्ञांचा विश्वास आहे पण मध्यवर्ती बँक ०.५० टक्क्यांची मोठी दर कपात करू शकते असाही काहींचा अंदाज आहे. बाजाराने आधीच ०.२५% दर कपातीच्या अपेक्षेला प्रतिसाद दिला असून फेडने समान दर कपात केल्यास बाजाराचा प्रतिसाद म्यूट राहू शकतो म्हणजे अशा परिस्थितीत, गुंतवणूकदारांमध्ये फारसा उत्साह राहणार नाही. त्याचवेळी, केवळ ०.५० टक्क्यांची दर कपात मार्केट भावनेला प्रोत्साहन देऊ शकते असंही काही विश्लेषकांचं मत आहे पण तज्ञ याउलट तर्क लावत आहेत. व्याज दरातील मोठी कपात यूएस अर्थव्यवस्थेची चिंताजनक स्थिती दर्शवू शकते ज्यावर बाजारात नकारात्मक प्रतिक्रिया दिसू येऊ शकतात.

एक्सपर्ट काय म्हणतात…
आनंद राठी शेअर ब्रोकर्सच्या सुजन हाजरा यांनी अमेरिकेत ०.५०% व्याजदर कपातीची शक्यता वर्तवली आहे. ‘काही अलीकडील डेटा विशेषत: श्रमिक बाजाराशी संबंधित अपेक्षेपेक्षा कमी आहेत पण आर्थिक स्थितीत लक्षणीय बिघाड सूचित करण्यासाठी सर्वकाही अद्याप पुरेसे नाही,’असे म्हटले. आर्थिक दृष्टीकोन लक्षणीय वाईट असल्यास फेड केवळ आक्रमक दर कपातीची निवड करेल तर सध्या, परिस्थिती तुलनेने संतुलित दिसत आहे त्यामुळे मोठी कपात होण्याची शक्यता कमी आहे.

हाजरा पुढे म्हणाले की बाजाराला व्याजदरात मोठी कपात अपेक्षित असून ०.२५% कपात काही बाजार सहभागींना निराश करू शकते जे फेडकडून आक्रमक कारवाईची अपेक्षा करत आहेत. दुसरीकडे, ०.५०% दर कपात अधिक नकारात्मक प्रतिक्रिया ट्रिगर करू शकतात कारण ते फेडद्वारे आर्थिक दृष्टीकोनाबद्दल अधिक चिंतेचे लक्षण म्हणून पाहिले जाऊ शकते. त्यांनी म्हटले की ०.२५% दर कपात जागतिक वित्तीय बाजारासाठी डोकेदुखी ठरू शकते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:10 16-09-2024