चिपळूण : हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्यावतीने खेर्डी येथे गोवत्स पूजन

रत्नागिरी : वसुबारस निमित्ताने खेर्डी (ता. चिपळूण) येथे हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्यावतीने गोवत्स पूजन करण्यात आले.

सवत्स धेनू हे पृथ्वीचेच एक रूप आहे. वसू म्हणजे पृथ्वी. तिच्या अंगाखांद्यावर आपण बागडतो म्हणून तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे वसुबारस. या व्रताच्या पालनामुळे वात्सल्य, प्रेम आणि जिव्हाळा प्रतीत होतो. या धर्मशास्त्राचे पालन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

खेडर्डी येथे अवधूत शेंबेकर यांच्या निवासस्थानी कार्यक्रम झाला. या वेळी समितीचे पराग ओक यांनी हे गोवत्स पूजन केले. गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिल्याबद्दल हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्यावतीने राज्य सरकारचे अभिनंदनही करण्यात आले. हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्यावतीने पराग ओक, आदित्य जोशी, सुरेश शिंदे, अभिनव भुरण, कृष्णा पंडित, नयनेश दळी आदींनी या नियोजनात सहभाग घेतला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 30/Oct/2024