राजापूर | प्रतिनिधी: कोकणचे प्रति-काशी मानले जाणारे आणि हजारो शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या राजापूरच्या ऐतिहासिक श्री धूतपापेश्वर देवस्थानचा महाशिवरात्र उत्सव यंदा १२ ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत अत्यंत उत्साहात साजरा होणार आहे. या सात दिवसांच्या उत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार असून, प्रशासक अरविंद चाळके यांनी भाविकांना दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
मुख्य आकर्षण: रविवार, १५ फेब्रुवारी – महाशिवरात्र यात्रा उत्सव
यंदा महाशिवरात्रीचा मुख्य यात्रा उत्सव रविवार, १५ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. या दिवशी पहाटेपासूनच कार्यक्रमांना सुरुवात होईल:
- पहाटे ३:०० वा. – नित्यपूजा आणि श्रींवर लघुरुद्राभिषेक.
- सकाळी ९:०० ते दुपारपर्यंत – भजन आणि भक्तीसंगीताचे कार्यक्रम (शामला कुलकर्णी, सुरस्नेह भजनी मंडळ-पुणे).
- दुपारी १२:०० वा. – ह.भ.प. नरहर दामोदर करंबेळकर (कणकवली) यांचे कीर्तन.
- दुपारी २:०० ते ४:०० वा. – गिरीश वारे यांचा संगीत कार्यक्रम आणि स्थानिक भजनी मंडळांची सेवा.
- रात्री ७:०० वा. – स्थानिक भजनांचा कार्यक्रम.
- मध्यरात्रीनंतर (पहाटे ३:०० वा.) – श्रींची महापूजा, महानैवेद्य आणि पहाटे ५:०० वाजता ‘भोवती’चा पारंपरिक कार्यक्रम.
उत्सव काळातील दैनंदिन कार्यक्रम (१२ ते १८ फेब्रुवारी)
उत्सवाच्या सातही दिवशी मंदिरात शिस्तबद्ध धार्मिक विधी पार पडणार आहेत:
- सकाळी ६:०० वा. – पारंपरिक वाद्यांच्या गजरात दिवसाची सुरुवात.
- सकाळी ६:३० वा. – नित्यपूजा आणि अभिषेक.
- सायंकाळी ७:३० वा. – शास्त्रीय गायन.
- रात्री ८:०० वा. – कीर्तन सेवा.
- रात्री १०:०० वा. – भोवती आणि ११:३० वा. महाआरती.
गुरुवार, १९ फेब्रुवारी: महाप्रसाद
उत्सवाची सांगता झाल्यानंतर गुरुवार, १९ फेब्रुवारी रोजी सर्व भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
भाविकांसाठी सूचना: राजापूरच्या या निसर्गरम्य परिसरातील मंदिरात शिवभक्तांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता, देवस्थान प्रशासनाकडून आवश्यक ती तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 12-02-2026














