रत्नागिरी: चरित्रकार धनंजय कीर स्मृती लेख स्पर्धेचा निकाल जाहीर

रत्नागिरी : थोर चरित्रकार, विचारवंत आणि पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघातर्फे जिल्हास्तरीय लेखस्पर्धेचे आयोजन केले होते.

लेखस्पर्धेचा निकाल जाहीर केला आहे.

ही स्पर्धा महाविद्यालय आणि खुला गट अशा दोन गटात आयोजित केली होती. लेख स्पर्धेच्या खुल्या गटात प्रथम मंजूश्री भागवत, द्वितीय श्रीनिवास सरपोतदार आणि तृतीय क्रमांक विभागून पद्मजा कारेकर व स्वानंदी जोगळेकर यांना जाहीर झाला आहे. महाविद्यालयीन गटात प्रथम क्रमांक अनिकेत नाडणकर यांना जाहीर झाला आहे. बक्षीस वितरण २१ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, कोकण विभाग ग्रंथालय संघ, रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त वार्षिक अधिवेशनात होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 12-02-2026