Sanjay Shirsat : 28 जानेवारी 2026 ला सकाळी विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं होतं. या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रा हळहळ व्यक्त केली जात आहे. अशातच अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत काही शंका देखील उपस्थित केल्या जात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काल पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या विमान अपघातातबाबत काही शंका उपस्थित केल्या आहेत. यावर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवारांनी जे आरोप केले त्याची दखल घेणे गरजेचे आहे. त्या शंकांचं निरसन झालं पाहिजे असे शिरसाठ म्हणाले.
नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट ?
अजितदादा गेल्याचे दुःख पूर्ण महाराष्ट्राला नाही तर देशभरातील त्यांच्या चाहत्यांना आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक शंका अनेक लोकांनी उपस्थित केल्या आहेत. त्या शंकांचं निरसन झालं पाहिजे. रोहित पवारांनी जे आरोप केले त्याची दखल घेणे गरजेचे आहे असं संजय शिरसाट म्हणाले. त्यांनी कालची मांडणी केली त्यात शंका घेण्याचं कारण आहे. त्याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, सीबीआय असो अथवा देशातील कोणतीही उच्च संस्थेनं चौकशी झाली पाहिजे असे शिरसाट म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते रोहित पवार?
सकाळी 7 वाजून 2 मिनिटांनी अजित दादांची क्रू तयारी झाली, 7 वाजून 3 मिनिटांनी बारामती येथी हवामान परिस्थितीचा आढावा घेतला गेला. सकाळी 8.73 ते 8.45 दरम्यान विमान दुर्घटना घडली असेल, असे रोहित पवार यांनी सांगितले. कारण, 9 वाजता अजित पवार गंभीर जखमी आहेत अशी बातमी समोर आली होती. तर, 9.45 वाजता अजित पवार गेल्याची बातमी समोर आली, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली. तसेच, हे विमान 2 दिवस आधी सुरतला जाऊन आले होते. याचे मालक म्हणाले, हवामानामुळे अपघात झाला असावा अशीही माहिती रोहित पवारांनी दिली. ग्रामपंचायत सीसीटीव्ही समोर आलं आणि त्यातून हवामान परिस्थिती समोर आली आहे. CCTV फुटेज पाहिल्यावर लक्षात येतं की, कंपनीच्या मालकाचा दावा पूर्णपणे खोटा ठरत असून यांत्रिक बिघाड झाला असावा हे स्पष्ट होतं असेल. मॅकेनिकल फेल्युअर झाले असेल का? विमान उडण्यापूर्वी चेक करण्यात आले होते का? रूटीन मेंटेनस झाला नव्हता का? असे प्रश्न उपस्थित होतं आहेत, असेही रोहित पवार यांनी म्हटले.
दादांचा अपघात स्वप्न असल्याचा भास मला होत होता. पण, अपघाताच्या घटनास्थळी जेव्हा मी पोहोचलो, तेव्हा तिथे सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. सगळे निशब्द झाले होते, कुणाला काही बोलता येत नव्हतं. अपघात झाल्यानंतर दादाचा स्वेटर मी पाहिला, घड्याळ पाहिलं. अजित दादा नेहमी आपलं घड्याळ 15 मिनिटे पुढे ठेवत होते, अपघातानंतर अजित पवारांच्या बंद घड्याळात 9 वाजलेले होते, अशी माहिती रोहित पवारांनी दिली. त्यामुळे, मला सर्वांना एवढच सांगायचं आहे की, जी घटना झाली नाही, दादांना काही झालं नाही असं आपल्या सर्वांना वाटतं. पण, तसे नसून ती घटना घडलीय. आज दादा आपल्यासोबत नसले तरी विचारांनी ते आपल्यासोबत आहेत, रोहित पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी, त्यांनी व्हिडिओ प्रेझेंटेशनही केलं.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 12-02-2026














