खोरनिनको येथे अपघातात दुचाकीस्वार जखमी

लांजा : सावर्डे येथून काम आटोपून भांबेड मार्गे खोरनिनको येथील रस्त्यावर दुचाकी स्वाराचा दुचाकी घसरुन अपघात झाला. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संदेश शरद रहाटवल (वय २५, रा. खोरनिनको, लांजा) असे जखमी स्वाराचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ८) दुपारी दिडच्या सुमारास खोरनिनको रस्त्यावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संदेश रहाटवल हे सावर्डे येथून काम आटोपून भांबेडमार्गे खोरनिनको येथे येत असताना रस्त्यात अचानक दुचाकी घसरुन अपघात झाला. तेथील सरपंच मुकेश गुरव यांनी तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लांजा येथे दाखल केले होत. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:28 12-02-2026