Sangmeshwar: महाशिवरात्रीला आमनायेश्वर मंदिरात प्रथमच दीपोत्सव

रत्नागिरी : बुरंबाड (ता. संगमेश्वर) येथील प्राचीन हेमाडपंथी बांधणीच्या श्री आमनायेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला प्रथमच दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.दरवर्षी उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होतो.यावर्षी १५ रोजी महाशिवरात्री दिनी सायंकाळी ७ ते ८.३० या वेळेत मंदिरात व मंदिराच्या सभोवातली दीपोत्सव साजरा होणार आहे.

मंदिर व मंदिर परिसरात सुमारे तेलाचे १५०० दिवे लावण्यात येणार आहेच. या दीपोत्सवाचे नियोजन बुरंबाड येथील लिंगायत समाजाच्या श्री देव आमनायेश्वर सेवा मंडळातर्फे करण्यात आले आहे.

दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक महाशिवरात्रीला मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. मंदिर परिसरात भरणाऱ्या जत्रेचे कुतूहल पंचक्रोशीतील सर्वांना होते. असते. यावर्षी दीपोत्सवामुळे झळाळून निघणाऱ्या मंदिराचे विलोभनीय दृश्य पाहण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. अशा पद्धतीचा दीपोत्सव प्रथमच होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 13-02-2026