देवरुख-काटवली रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात! ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश, वर्षभराची प्रतीक्षा संपली

देवरुख: गेल्या एक वर्षापासून रखडलेल्या देवरुख-काटवली रस्त्याच्या (Devorukh-Katvali Road) डांबरीकरणाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे हैराण झालेल्या ग्रामस्थांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाचा प्रारंभ केला आहे.

आंदोलनाचा इशारा आणि कामाला गती:

देवरुख ते गणपती मंदिर ओझरे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. काटवली पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते संजय घाग यांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला होता. जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल या भीतीने बांधकाम विभागाने जानेवारी २०२५ मध्ये या कामाचा पहिला टप्पा सुरू केला आहे.

रस्त्याचे काम प्रलंबित असल्याने ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. आता काम सुरू झाल्यामुळे या भागातील वाहतूक अधिक सोयीस्कर होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:51 13-02-2026