जिल्हास्तरीय तायक्वॉंदो स्पर्धेत लांजा तालुका संघाची दमदार कामगिरी

लांजा (प्रतिनिधी): रत्नागिरी येथे नुकत्याच पार पडलेल्या १९ व्या जिल्हास्तरीय खुल्या तायक्वॉंदो स्पर्धेत तायक्वॉंदो अँड फिटनेस ॲकॅडमी लांजा अकॅडमीतील खेळाडूंनी विविध पदके पटकावली आहेत.

रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने आणि तायक्वांदो संघ रत्नागिरी यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय खुली तायक्वॉंदो स्पर्धा ६ ते ८ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल मारुती मंदिर येथे संपन्न झाली.
या स्पर्धेत तायक्वॉंदो अँड फिटनेस ॲकॅडमी लांजाच्या स्वर्णिम श्रेयश शेट्ये, तेजस्वी दशरथ लाड ,भक्ती कुंभार यांनी सुवर्णपदक पटकावले.‌

अन्वी सचिन पवार ,आराध्य कमलाकर सावंत यांनी रौप्य पदक, प्रिया लांजेकर,राजवर्धन माने,आर्या आग्रे ,आदिश्री शेट्ये,योगेश तोंडारे यांनी कास्यपदक पटकावले. या स्पर्धेत खेळाडू आर्या देसाई,विघ्नेश दिवाळे,तनया पाटकर ,वैष्णवी मणचेकर ,निधी लिंगायत,वृत्ती पावसकर,आराध्या आग्रे,आर्या पवार ,रोहन साबळे,,प्रशांतसिंग चव्हाण,सागर चौगुले यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत राष्ट्रीय पंच तेजस्विनी विरेंद्र आचरेकर यांनी पंचप्रमुख म्हणून काम पाहिले. तसेच या सर्व खेळाडूंना लांजा तालुका प्रमुख प्रशिक्षक तेजस पावसकर,शितल आचरेकर, गणेश तोंडारे यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व पदक विजेते व सहभागी खेळाडू, प्रशिक्षक यांचे तायक्वांदो फिटनेस अकॅडमी लांजा चे अध्यक्ष किशोर यादव, उपाध्यक्ष अमोल रेडीज, सचिव तेजस्विनी आचरेकर, सहसचिव अनुजा कांबळे, सदस्य रोहित कांबळे, अकॅडमीचे मार्गदर्शक तेजस वडवलकर व समस्त पालक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 14-02-2026