रत्नागिरी : देवरुख नगरपंचायतीतर्फे विकास आराखडयासंदर्भात नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन येत्या सोमवारी, दि. १६ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.
सोमवारी सायंकाळी ४ वाजता देवरूख नगरपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमात प्रभारी सहायक संचालक नगररचना विराज बोडस विकास आराखड्याशी संबंधित विविध बाबींवर मार्गदर्शन करणार आहेत नागरिकांच्या शंकांना उत्तरे देणार आहेत. शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याबाबत नागरिकांच्या शंकाचे निरसन व्हावे व त्यांच्या समस्या जाणून घेता याव्यात, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
देवरूख शहरातील सर्व नागरिकांनी व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून विकास आराखड्याबाबत त्यांना आवश्यक असलेली माहिती करून घ्यावी, आपल्या शंका मांडाव्यात व त्यांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन देवरूख नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 14-02-2026














