रत्नागिरी : भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची संधी

रत्नागिरी : भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदासाठी पूर्व प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे. भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या परीक्षेच्या पूर्व तयारी करीता छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे शासनातर्फे राज्यातील नवयुवक व नवयुवतींसाठी ०२ डिसेंबर २०२४ ते ११ डिसेंबर २०२४ या कालावधीत SSB कोर्स क्र. ५९ आयोजित करण्यात येत आहे.

कोर्स कालावधीत प्रशिक्षणर्थीना निःशुल्क प्रशिक्षण निवास व भोजन दिले जाते. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय रत्नागिरी येथे २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता मुलाखतीस हजर राहावे. मुलाखतीस येताना Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करून त्यामधील SSB-59 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरून सोबत घेऊन यावे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक (ईमेल आय डी: training.petenashikgmail.com) व दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ किंवा व्हॉटस्अॅप क्रमांक ९१५६०७३३०६ वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 30/Oct/2024