गोळप ग्रामपंचायत येथे वित्तीय साक्षरता शिबिराचा ग्रामस्थांना लाभ

रत्नागिरी : जिल्हा अग्रणी बँक बँक ऑफ इंडियातर्फे गोळप ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या वित्तीय साक्षरता डिजिटल फसवणूक जनजागृतीच्या शिबिराचा लाभ परिसरातील ग्रामस्थांना झाला.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार देशातील तळागाळातील प्रत्येक व्यक्तीमध्ये वित्तीय साक्षरता निर्माण करण्याच्या उद्देशाने गेल्या 9 फेब्रुवारीपासून वित्तीय साक्षरता सप्ताहाचे आयोजन केले आहे. त् अनुषंगाने बँक ऑफ इंडियाचे आंचलिक प्रबंधक नरेंद्र रघुनाथ देवरे आणि उपआंचलिक प्रबंधक अंजनी कुमार सिंह आज़ाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अग्रणी बँकेने गोळप येथे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

बँक ऑफ इंडिया पावस शाखा व्यवस्थापक रचना भोसले, गोळपच्या सरपंच प्रियंका सुर्वे, उमेद प्रभाग संघ अध्यक्ष श्रावणी देसाई, उमेद प्रभाग संघ व्यवस्थापक सीमा सुर्वे, प्रभाग संघ सचिव सुप्रिया लालगे आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिराला भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वित्तीय समावेशन आणि विकास विभाग मुंबई क्षेत्रीय कार्यालयाचे प्रबंधक तथा आरबीआय लीड डिस्ट्रिक्ट ऑफिसर रत्नागिरी बेनज़िर शेख प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी री-केवायसी का आवश्यक आहे, सी-केवाईसी, मनी म्यूल खाते याबाबत पीपीटी प्रेझेंटेशन व व्हिडीओद्वारे मार्गदर्शन केले. डिजिटल फसवणूक टाळण्याचे उपाय आणि डिजिटल अॅरेस्ट या महत्त्वाच्या विषयावर जनजागृती केली. अग्रणी जिल्हा व्यवस्थापक श्री. दर्शन दत्ताराम कानसे यांनी डिजिटल आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहण्याचे आवाहन केले.

शिबिराला 160 हून अधिक नागरिक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:44 16-02-2026