आबलोली (वार्ताहर): गुहागर तालुका सरपंच संघटनेची बैठक नुकतीच उत्साहात संपन्न झाली. या बैठकीच्या प्रारंभी स्वर्गीय अजित दादा पवार यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर नवीन सरपंच झालेल्या सभासदांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर वाघर तालुका सरपंच संघटनेची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
यावेळी अध्यक्षपदी समित सत्यवान घाणेकर तर उपाध्यक्षपदी आबलोली गावच्या सरपंच वैष्णवी नेटके यांची फेरनिवड करण्यात आली. तसेच सचिव पदी जान्हवी धनंजय विखारे, खजिनदारपदी आशीर्वाद दयानंद बावस्कर, कार्याध्यक्षपदी सचिन रामचंद्र म्हसकर तसेच सदस्य पदी दिव्या सुमित वनकर, आर्या अमित मोरे, कोमल काशिनाथ मुरमुरे, प्रगती प्रकाश मोहिते, सिया सचिन गुजर, विजय अर्जुन तेलगडे, नारायण धोंडू आग्रे, मानसी मंगेश कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संपूर्ण कार्यकारिणीचे गुहागर तालुक्यातील सर्वच समाज घटकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:44 16-02-2026














