मुरादाबाद: मनोरंजनसृष्टीत सध्या राजपाल यादवच्या चेक बाऊन्स प्रकरणाची चर्चा असतानाच आता बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. मुरादाबाद न्यायालयाने एका जुन्या फसवणूक प्रकरणात अमिषा पटेलविरोधात अजामीनपात्र वॉरंट (Non-Bailable Warrant) जारी केले आहे. वारंवार समन्स बजावूनही ती न्यायालयात गैरहजर राहिल्याने न्यायालयाने हे कडक पाऊल उचलले आहे.
नेमके प्रकरण काय?
- तक्रार: २०१७ मध्ये मुरादाबाद येथील ‘ड्रीम व्हिजन’ या इव्हेंट कंपनीचे मालक पवन कुमार यांनी अमिषाविरोधात तक्रार दाखल केली होती.
- आरोप: एका लग्नसमारंभात डान्स परफॉर्मन्ससाठी अमिषाने ११ लाख रुपये आगाऊ (Advance) घेतले होते. मात्र, पैसे घेऊनही ती कार्यक्रमाला उपस्थित राहिली नाही, असा आरोप तक्रारदाराने केला आहे.
- चेक बाऊन्स: तक्रारदाराने पैशांची मागणी केल्यानंतर अमिषाने काही रक्कम परत केली, पण उर्वरित रकमेसाठी दिलेला चेक बँकेत बाऊन्स झाला.
न्यायालयाची भूमिका आणि सुनावणी
गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी मुरादाबाद न्यायालयात सुरू आहे. न्यायालयाने अनेकदा अमिषाला प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, अमिषा किंवा तिचे वकील न्यायालयात हजर न राहिल्याने अखेर अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे.
पुढील सुनावणी कधी?
या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ मार्च २०२६ रोजी मुरादाबाद न्यायालयात होणार आहे. आता या तारखेला अमिषा पटेल न्यायालयात हजर होणार की तिला अटकेला सामोरे जावे लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:17 16-02-2026














