गुहागर : ‘मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, लवकर जा मतदान करा, नवे वारे नवी दिशा, मतदानच आहे उद्याची आशा, निर्भय होऊन मतदान करा, अधिकाराचा सन्मान करा’, अशा घोषणा देत – पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शनिवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वा. मतदार जनजागृती रॅली काढली.
पाटपन्हाळे शृंगारतळी येथे दर शनिवारी आठवडा बाजार भरतो. या बाजारपेठेमध्ये पंचक्रोशीतील मळण, निवोशी, वेळंब, गिमवी, काजळी, चिखली, मुंढर, तळवली, निगुंडळ, वाकी, पिंपळवट आदी गावातील ग्राहक येथे खरेदीसाठी येत असतात.
हाच धागा पकडन दि २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी बहुसंख्येने मतदान व्हावे, याकरिता ही उदबोधन रॅली काढण्यात आली.
यावेळी प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई उपस्थित होते. रॅली महाविद्यालयापासून बाजारपेठ मार्गे आबलोली, जानवळे फाटा ते पुन्हा महाविद्यालय अशी काढण्यात आली. रॅली यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण सनये, आजीवन अध्ययन विस्तार विभागाचे समन्वयक डॉ. दिनेश पारखे, प्रा. सौम्या चौगुले, प्रा. कांचन कदम, प्रा. सुभाष घडशी, डॉ. जालिंदर जाधव आदींनी परिश्रम घेतले. वाणिज्य विभागप्रमुख डॉ. सुभाष खोत, प्रा. लंकेश गजभिये, डॉ. प्रसाद भागवत, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 30/Oct/2024