कोकण रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात सामंजस्य करार

मुंबई: कोकणातील पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना देण्यासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्यात महत्त्वाचा सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. या करारामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीच्या समन्वयातून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कराराची मुख्य वैशिष्ट्ये:

  • क्षेत्र: रेल्वे-रस्ता समन्वय, लॉजिस्टिक्स, बोगदे आणि पुलांचे बांधकाम, तसेच उतार सुरक्षा या क्षेत्रांत दोन्ही संस्था संयुक्तपणे काम करणार आहेत.
  • प्रवासी सुविधा: प्रवासी आणि चालकांसाठी प्रगत सुविधा तसेच ‘स्मार्ट सोल्युशन्स’ विकसित करण्याचा या कराराचा मुख्य उद्देश आहे.
  • उपस्थिती: केआरसीएलचे संचालक राजीवकुमार मिश्र आणि एनएचएआयचे अध्यक्ष संतोष कुमार यादव यांच्या उपस्थितीत हा करार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या साक्षिने करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 17-02-2026